आदिवासी बांघवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास साधण्यसाठी १९८३ साली आदिवासी विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. सन १९९२ या मध्ये पुनर्रचना करून ३० प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सन २०१२ मध्ये नंदुरबार विभाग प्रकल्पातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक हे विभागून वेगळे झाले. या प्रकल्पामध्ये शिरपूर आणि साक्री हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दोन तालुके आहेत तर सिंदखेडा व नाशिक हे आदिवासी क्षेत्राबाहेरील दोन तालुके आहेत. मागील जनगणने नुसार धूळे जिल्ह्याची लोकसंख्या २०५०८३२ आहे त्या पैकी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ६४७३१५ आदिवासी लोकसंख्या आहे त्याची टक्केवारी ३१.५६ इतकी आहे. सन २०१२पासून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील आदीवासी जनतेसाठी विकासाच्या योजना या कार्यालया मार्फत राबविल्या जात आहेत.
या कार्यालया अंतर्गत शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने २२ शासकीय आश्रम शाळा व ३४ अनुदानित तसेच १ इंग्रजी माध्यम , १ एकलव्य इंग्लिश मेडियम शाळा असून या शाळा मधून विद्यार्थी घडवण्याचे काम चालू आहे. विद्यार्थी यांना आपल्या मर्जी प्रमाणे शालेय साहित्या खरेदी करण्यासाठी शासना Read more.