महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , नाशिक
24, बडगुजर प्लॉट 80 फीट रोड नाशिक ता. जिल्हा नाशिक - 424001
आदिवासी बांघवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास साधण्यसाठी १९८३ साली आदिवासी विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. सन १९९२ या मध्ये पुनर्रचना करून ३० प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सन २०१२ मध्ये नंदुरबार विभाग प्रकल्पातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे हे विभागून वेगळे झाले. या प्रकल्पामध्ये शिरपूर आणि साक्री हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दोन तालुके आहेत तर सिंदखेडा व धुळे हे आदिवासी क्षेत्राबाहेरील दोन तालुके आहेत. मागील जनगणने नुसार धूळे जिल्ह्याची लोकसंख्या २०५०८३२ आहे त्या पैकी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ६४७३१५ आदिवासी लोकसंख्या आहे त्याची टक्केवारी ३१.५६ इतकी आहे. सन २०१२पासून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील आदीवासी जनतेसाठी विकासाच्या योजना या कार्यालया मार्फत राबविल्या जात आहेत.
या कार्यालया अंतर्गत शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने २२ शासकीय आश्रम शाळा व ३४ अनुदानित तसेच १ इंग्रजी माध्यम , १ एकलव्य इंग्लिश मेडियम शाळा असून या शाळा मधून विद्यार्थी घडवण्याचे काम चालू आहे. विद्यार्थी यांना आपल्या मर्जी प्रमाणे शालेय साहित्या खरेदी करण्यासाठी शासना तर्फे डी. बी. टी. द्वारे पैसे विद्यार्थी च्या खातेवर टाकले जात आहेत. आणि यामुळे आश्रम शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज या शाळामधून विद्यार्थी घडवण्याचे काम चालू आहे. शैक्षणिक प्रगती बरोबर शारीरिक विकास, सांकृतिक क्रिडा विकास या बाबतीकडे कार्यालया मार्फत लक्ष पुरवले जाते. आदिवासी मुला-मुलीकरिता तालुका स्तर जिल्हा स्तर असे एकूण २९ वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. जिल्हास्तरीय वसतीगृहामध्ये आता डी. बी. टी, द्वारे पेसे लाभार्थी च्या खातेवर टाकले जातात यामुळे लाभार्थी विद्यार्थी आपल्या मर्जी प्रमाणे जेवण ,नास्ता घेऊन आपले शिक्षण घेत आहेत.
आदिवार्सीच्या आधिक उन्नती करिता आदिवासी कुटुंबाचा विकास हा मुख्य उद्देश मानून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना तसेच सामुहिक लाभाच्या विविध योजना आणि बचत गटासाठीच्या विविध योजना कार्यालयामार्फत राबविण्यात येतात. या योजनाच्या माध्यमातून आदिवासी कुटूबाच्या विकास साधला जात आहे. बचत गट सक्षम करून त्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मदत केली जाते. आज बहुतांस लाभ हा धेट लाभार्थाच्या खात्यावर डी. बी. टी द्वारे दिला जात असल्यामुळे तक्रारींना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.
आदिवासी विकास विभाग शिक्षण क्षेत्रा मध्ये जास्त लक्ष पुरवत असून त्यातून चांगले विद्यार्थी घडले जावेत हा उद्देश्या डोळ्या समोर ठेवला जात आहे . विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा करिता भारत सरकार शिष्यवृत्ती शाळेतील गळती थांबवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, परीक्षा फी सलवत, शिक्षण फी सवलत निर्वाह भत्ता इ. आणि या पूरक शासनच्या योजना प्रभावी पणे कार्यालयामार्फत राबविल्या जात आहेत. Wash कार्यक्रम, कायापालट अभियान शाळेमधून राबविले जात आहे ,.यातून मुलांना चांगल्या सवयी मुलांना लागत आहेत. आश्रम शाळेमध्ये बालमृत्यू न होऊ देण्यासाठी प्रकल्प कार्यालय सजग आहे. आज पुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत ८ शाळा ISO झाल्या आहेत. आणि शासकीय आश्रम शाळा सिरसोले मध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असल्यामुळे सदर शाळा धुळे जिल्हया मध्ये प्रसिद्ध पावत आहे.
प्रकल्प कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या या आदिवासीच्या कल्याणकारी योजनाचे स्वरूप व उद्दिस्टे, व कोणत्या योजने साठी काय पात्रता गरजेची आहे या साठी हि माहिती पुस्तीका अत्यंत महत्वाची आहे. आणि सविस्तर माहिती साठी आपण या कार्यालयाच्या तसेच शासनाच्या संकेत स्थळाला अवश्य भेट द्यावी. किंवा प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष भेटून चौकशी करावी. कार्यालयांतर्गत चालणाऱ्या योजनाची माहिती एका पुस्तकात आदिवासी जनतेस उपलब्ध व्हावी या दृष्टीने सदर माहिती पुस्तिका तयार करण्याचा केलेला हा एक प्रयत्न आहे.
अधिक माहितीसाठी -
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे कार्यालयात भेट द्यावी.